श्रद्धा सुमन !

आपण अगदी लहानपणापासून आपले आई वडील, मामा, काका, आजी आजोबा, आपले शिक्षक ह्यांच्या पासून प्रेरणा घेत असतो. ते गेल्यावर त्यांच्या आठवणी जपत असतो. नकळतपणे त्यांच्या पदाचिन्हावर चालण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या आठवणी काढतो. खरे तर श्राद्ध म्हणजे तरी काय आहे, तुमची आठवण आम्हास पदोपदी येत असते, अजूनही तुम्ही आमच्या जीवनात तितक्याच महत्वाच्या , आदरणीय व्यक्ती…

आठवणी गौरी गणपतीच्या

लहानपण देगा देवा ! उद्या अनंत चतुर्दशी. दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होऊन गणपतीची धूम संपलेली असेल. खरे तर धूम हा शब्द मी उगाचच वापरला. कारण आपल्या सगळ्याच सणांवर या वर्षी कोरोनाची संक्रांत आली आहे. त्याचे सावट हटता हटत नाही. या वर्षी सगळेच  सण  कसे बंद दाराआड आणि गुपचूप पणे  उरकावे लागले. ना फटाक्यांची आतषबाजी ना…

मुक्तिधाम ३४

गोष्ट त्या दोघींची !जुळलेल्या ऋणानुबंधाची ! गणपती आणि गौरीचा उत्सव पूर्वी गुरुजींच्या घरी जसा साजरा होत असे त्याच पद्धतीने मुक्तिधाम मध्ये साजरा होऊ लागला. तेच ते गौरीचे पितळी मुखवटे, तेच गौरीच्या हातातील सुवर्ण बिलवर आणि इतर अलंकार. गर्भरेशमी सुंदर साड्या , सुवासिक फुलांचे गजरे, हार घालून थाटात उभ्या असलेल्या गौरी. एक शक्तीचे आणि एक युक्तीचे…

आठवणीतील श्रावण !

बाळपणीचा काळ सुखाचा. आज श्रावण सोमवार आणि उद्या श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस. अर्थात पिठोरी अमावस्या. श्रावण सोमवार आला कि लहानपणीची श्रावण सोमवारची आठवण होते. लहान असताना आपल्याला नवीन गोष्टीचे कुतूहल, आनंद, नवीन काहीतरी शिकण्याची हौस असते. श्रावण सोमवारी माझी आजी मला लवकर उठवत असे. आंघोळ करून, आजी तिचे ठेवणीतील एकमेव जरीकाठी झुळझुळीत नऊ वारी पातळ…

भगवान श्रीकृष्ण !

आमच्या जीवनाचा आधार जर कुणी असेल तर तो श्रीराम आहे आणि आमची तत्वाज्ञानाची बैठक जर असेल तर ती श्रीकृष्णाच्या आचार विचारात आणि शिकवणुकीतून आपल्याला दिसते. श्रीकृष्ण आणि श्रीराम ह्यांनी आपल्याला जीवन अमृत पाजले, जीवनाचे तत्वज्ञान शिकवले आणि जीवन संघर्षही शिकवला. कितीही अडचण आली, दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी त्यातून मार्ग काढून यशस्वी कसे व्हावयाचे, आनंदी…

आजी सोनियाचा दिनु !

५ ऑगस्ट रोजी, अयोध्येमध्ये बहुप्रतीक्षित आणि बहूचर्चित राम मंदिराचा पायाभरणीचा समारंभ होतोय. गेल्या पाच शतकांचे हिंदू भाविकांचं, आपल्या रामरायावर प्रेम करणाऱ्या हिंदू बांधवांचे स्वप्नं साकार होत आहे. किती प्रतिक्षा, किती वणवण, किती मनस्ताप सहन करावा लागला आपल्या देवाला ! आमच्या रामलल्लाला त्याच्याच मंदिरातून, मातृभूमीतून बेदखल केले होते. सत्य युगात जेंव्हा त्याचा अवतार झाला तेंव्हा कैकेयीच्या…

मुक्तिधाम ३३

विठू माझा लेकुरवाळा ! महाराष्ट्रातील विविध संतांचे विचारधन आणि कार्यकर्तृत्व ! संत ज्ञानेश्वर (भाग ५) नवरात्र संपलं आणि ज्ञानेश्वरांनी ठरवले आता पंढरपूरला प्रस्थान ठेवावे लागेल. त्याने आपला विचार निवृत्तीनाथांना सांगितला. सोपानदेव, मुक्ताबाई, चांगदेव, आणि विसोबा चाटीहि तयार झाले. गावातील ज्ञानेश्वरांचे लहानपणीचे सवंगडी, बाया बापड्या, ज्ञानदेवांना माउली म्हणून मानणारी सर्वसामान्य जनता ह्या सगळ्यांचीच इच्छा होती कि…

मुक्तिधाम ३२

विठू माझा लेकुरवाळा ! महाराष्ट्रातील विविध संतांचे विचारधन आणि कार्यकर्तृत्व ! संत ज्ञानेश्वर (भाग ४) मुक्तिधाम मधील सर्व भगिनींना पुढे काय झाले या बद्दल उत्सुकता वाटत होती. सीमंतिनीबाई जरी म्हणाल्या कि शंकरराव खूप सुंदर सांगतील तरी बाईंनी ज्ञानोबा माउलीचे चरित्र इतके रसाळ भाषेत सांगितले कि त्यांचे गोष्ट सांगणे संपूच नये असे वाटत होते. कालचा भागात…

मुक्तिधाम ३१

विठू माझा लेकुरवाळा ! महाराष्ट्रातील विविध संतांचे विचारधन व कार्यकर्तृत्व. संत ज्ञानेश्वर (भाग ३) सीमंतिनीबाई कालची गोष्ट पुढे सांगू लागल्या. जेंव्हा आळंदीच्या ब्रह्मवृंदाने विठ्ठलपंतांना सांगितले कि तुमच्या कर्माला, आणि संन्याशाच्या संसाराला, आणि तुम्ही केलेल्या या अक्षम्य चुकेला एकच प्रायश्चित ‘देहांत प्रायश्चित!” त्या वेळी त्या उभयतांनी असा विचार केला कि आमच्या लेकरांचे नष्टचर्य आमच्या देहांत प्रायश्चित्ताने…

मुक्तिधाम ३०

विठू माझा लेकुरवाळा ! महाराष्ट्रातील विविध संतांचे विचारधन आणि कार्य कर्तृत्व ! संत ज्ञानेश्वर (भाग २) सीमंतिनीबाईंनी अत्यंत प्रसन्न चित्ताने हॉलमध्ये प्रवेश केला. आज ज्ञानोबा माउली बद्दल, त्यांचे गुरु आणि नाथ परंपरेचे श्रेष्ठ संत निवृत्तीनाथ, माऊलींची जणू सावली शोभावी असे सोपानकाका आणि जगत्जननीचे महत्व लहान वयात प्राप्त झालेली मुक्ताई ह्यांच्याबद्दल ऐकण्यासाठी सर्व महिला जणूकाही अगदी…

मुक्तिधाम २९

विठू माझा लेकुरवाळा ! महाराष्ट्रातील विविध संतांचे विचारधन आणि कार्यकर्तृत्व संत ज्ञानेश्वर (भाग १) सीमंतिनीबाई मुक्तिधामच्या हॉल मध्ये आल्या तर बायका आधीच बसल्या होत्या. त्या मुक्तिधामच्या ऑफिस मध्ये बसल्या असताना त्यांना असे समजले कि विद्यानगरी मध्ये जी राम टेकडी आहे तिथे राम मंदिरात अवंतिकाबाईंचे कीर्तन सप्ताह सुरु आहेत त्यामुळे कीर्तनात पेटीवर साथ करायला त्यांचे पती…

मुक्तिधाम २८

View Post विठू माझा लेकुरवाळा ! सरला ने अभंग गायला सुरवात केली. त्या आधी सीमंतिनीबाईंच्या हस्ते विठूमाऊलीच्या फोटोला हार घातला. सरला जनाबाईचा अभंग गाऊ लागली. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी,चोखा जीवा बरोबरी बंका कडेवर, नाव करांगुली धरी जनीं म्हणे…